शेतक-याना दुबार पेरणीची मदत म्हणून पंधरा हजार रूपये देणार….

133
2
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर; अडीच हजार हेक्टर मध्ये दुबार पेरणी करावी लागणार…

सावंतवाडी ता.२०:

परतीच्यापावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला प्रथमता उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.त्यासाठी आवश्यक असलेली दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पंधरा हजार रुपये अनुदान द्या,असे आवाहन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीस उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना केले.यावेळी अडीच हजार हेक्‍टर क्षेत्रामध्ये दुबार पेरणी चा संभाव्य आराखडा तयार करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी.जी.बागल यांनी सांगितले.मात्र हे क्षेत्र अजून जास्तीत जास्त वाढवण्यावर भर द्या,त्यासाठी गावागावात जनजागृती करा,असेही श्री.केसरकर यांनी अधिकाऱ्यांना सुचित केले.
येथील शासकीय विश्रामगृहावर श्री.केसरकर यांनी जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.यावेळी केसरकर बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा ऊर्फ वसंत केसरकर,तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा परिषद अध्यक्ष मायकल डिसोजा, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर आदी उपस्थित होते.
यावेळी केसरकर म्हणाले, भातशेतीच्या सुरुवातीला जून ते ऑगस्ट दरम्यान पूरपरिस्थितीत व भात कापणीच्या वेळी कायर वादळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात शेती मध्ये ज्या गावात जास्त नुकसान झाले अशा गावांची यादी तयार करा त्या गावांमध्ये जाऊन दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून यांत्रिकीकरणावर शेतीबाबत जनजागृतीवर भर द्या श्री लागवड पद्धतीव्दारे भात शेतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच अशा पद्धतीने ात शेती केल्यास हेक्‍टरी पंधरा हजार रुपये अनुदान मिळणार असल्याची माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.
केसरकर म्हणाले श्री लागवड पद्धतीने दुबार भातशेती करण्यासाठी गावागावात वनराई बंधारे बाबत विशेष कार्यक्रम हाती घ्या जेणेकरून पाण्याची उपलब्धता होऊन शेतकऱ्यांना दुबार शेती करण्यास सुलभ होईल आवश्यक असल्यास कोकण कृषी विद्यापीठ तसेच अन्य मार्गाने कृषी विभागाला मदत देऊ मात्र काही झाले तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा पायावर उभा करायचं आहे यासाठी प्रत्येकाने कामाला लागा.