एकमेकांवर केलेल्या हल्ल्यानेच मडु-यातील “त्या” मगरींचा मृत्यू…

212
2
Google search engine
Google search engine

शवविच्छेदन प्रक्रियेनंतर;
पशुवैदयकीय अधिका-यांचा दावा…

बांदा ता.२३: मडुरा मोरकेवाडी येथे मृतावस्थेत आढळलेल्या दोन्ही मगरींचा मृत्यू हा त्यांच्याकडून झालेल्या एकामेंकावरील हल्ल्यात झाला.यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या,असा निष्कर्ष पशुवैद्य अधिकारी डॉ. साळगावकर यांनी शवविच्छेदनाअंती काढला आहे.त्या दोन्ही मगरींच्या अंगावर खोलवर दात होते.जबड्याला जखमा होत्या त्यामुळे झटापटीत हा प्रकार घडला.त्यातचं त्यांचा मृत्यू झाला असावा,असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी या मगरींच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. त्या मगरी मेल्या की मारल्या याची चौकशी करणार असल्याचे म्हटले होते.परंतु पशुवैद्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर या सर्व गोष्टीला पूर्णविराम मिळाला आहे. तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे वाढत्या मगरींचे प्रमाण भविष्यात स्थानिक लोकांना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.