आंबोलीत कंटेनरसह तब्बल ७०० बॉक्स दारुसाठा जप्त…

985
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एसएसटी पथकाची कारवाई; ३३ लाखाच्या दारुसह ५३ लाखाचा मुद्देमाल जप्त…

आंबोली,ता.२४: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा कंटेनर आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी केरळ येथील एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ३३ लाखाच्या दारुसह २० लाखाचा कंटेनर असा मिळून ५३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आंबोली तपासणी नाक्यावर करण्यात आली. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी नेमलेल्या एसएसटी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

\