संजू परब प्रामाणिक, त्यांच्यावर नारायण राणेंचा पुर्ण विश्वास

2

निलेश राणे:त्यांच्या प्रेमाखातर आलो राजकारण करण्यासाठी नाही

सावंतवाडी/शुभम धुरी ता.१९:  मी संजू परब यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलो,बाकीचे आले ते राजकारण करण्यासाठी.सत्तेत असून त्यांनी काम केले असते तर त्यांना विरोधकांना भेटावे लागले नसते असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांना लगावला.
श्री राणे आज संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सायंकाळी उशिरा दाखल झाले यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले केवळ संजू परब यांच्या प्रेमाखातर मी या ठिकाणी आलो आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. त्यांना यश निश्चित आहे यात शंका नाही.
वाढदिवसाल अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम असतो त्यात राजकारण होऊ शकत नाही
यावेळी सनी कुडाळकर ,निखिल पाटील, विशाल परब, सुधीर आडिवरेकर, राजू बाग,गुरू पेडणेकर, आदी उपस्थित होते

3

4