दोन शिक्षक विधान परिषद व दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर…

173
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०८: मुंबईसह कोकण, नाशिक अशा दोन शिक्षक व दोन पदवीधर संघाची निवडणूक चार जूनला होत आहे. यासाठी २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. छाननी प्रक्रिया २४ मे ला होणार आहे, तर २७ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघ या चार जागांचा यात समावेश आहे. विद्यमान आमदार विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील यांची मुदत ७ जुलैला संपत असल्यामुळे निवडणूक आयोगाने दोन शिक्षक मतदार संघ आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी हा निवडणूक कार्यक्रम राबवला आहे.

\