ग्रामीण भागातील विक्रेत्यांना सावंतवाडीत प्राधान्याने जागा द्या…

11
2
Google search engine
Google search engine
Google search engine

महिला शिवसेनेची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर…

सावंतवाडी,ता.२५: श्रावण महिना आणि चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून फुले रानभाज्या तसेच अन्य गावठी साहित्य विक्री करण्यासाठी येणाऱ्या विक्रेत्यांना प्राधान्याने जागा द्या, त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, अशी मागणी सावंतवाडी महिला शिवसेनेच्या माध्यमातून मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान त्या ठिकाणी काही परप्रांतीय विक्रेत्यांकडून आपली जागा असल्याचे सांगून जागा बळकाविण्याचा प्रकार होत आहे. मात्र त्या ठिकाणी स्थानिक विक्रेता बसल्यास त्यांना मुभा देण्यात यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन शिवसेनेच्या महिला संघटक नीता कविटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले आहे.
यावेळी माजी नगरसेविका शुभांगी सुकी, पूजा नाईक, भारती मोरे, अनारोजीन लोबो, निलीमा चलवाडी, शिवानी पाटकर, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.

\