स्टेज वर नाही तर लोकांमध्येच जमिनीवर बसून आदित्य ठाकरेंनी साधला पुरग्रस्तांशी संवाद

2

सावंतवाडी,दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप

सावंतवाडी ता.१९: शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मणेरी, सासोली, झोळंबे, व सावंतवाडी तालुकयातील असनिये, बांदा, दाभीळ, शिरशिंगे, आंबोली या पूरग्रस्त भागाची पाहणी केली.यावेळी लोकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी लोकांची विचारपूस केली.शिवसेना आपल्या सदैव पाठीशी असल्याचे सांगत पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी लोकांना धीर दिला.विशेष म्हणजे बांदा येथे विठ्ठल मंदिरात पुरग्रस्तांशी संवाद साधताना स्टेज न बसता लोकांमध्ये बसून त्यांनी पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना भांडी, डाळ, तांदूळ, चटई, चादर, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना धनादेशाचे वितरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. पुरामुळे खचून न जाता पुन्हा नव्याने संसार उभा करा कोणत्याही गोष्टीची आवशक्यता असल्यास शिवसेनेची आठवण काढण्याचे आवाहनही यावेळी आदित्य ठाकरेंनी पूरग्रस्त कुटुंबियांना केले.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक ,सिंधुदुर्ग जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर सचिन अहिर, जिल्हाप्रमुख संजय पडते,विधानसभा महिला संपर्क प्रमुख सूचिता चिंदरकर, युवासेना समन्वयक सुशील चिंदरकर, जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, गीतेश कडू, आदींसह शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

1

4