जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन खात्यात जमा… आम. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश…

195
2

मालवण, ता. १९ : महावितरणच्या जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक कंत्राटी कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांचे मानधन रखडले होते. याप्रश्‍नी आमदार वैभव नाईक यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आज सायंकाळी सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचे गेल्या दोन महिन्यांचे मानधन रखडल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या कंत्राटी कर्मचार्‍यांनी याप्रश्‍नी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तत्काळ महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधत या समस्येसंदर्भात लक्ष वेधले. यावर झालेल्या चर्चेअंती कंत्राटी कर्मचार्‍यांचे मानधन जमा करण्याची कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. त्यानुसार आज सायंकाळी जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक कंत्राटी कर्मचार्‍यांच्या खात्यात मानधन जमा झाले आहे.

4