सावंतवाडीच्या साक्षीचे तेलंगणा-राज्य “किकबॉक्सिंग “स्पर्धेत यश…

2

रौप्य पदकाची मानकरी; श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थीनी…

सावंतवाडी ता.२५: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणारी साक्षी नारायण गावडे ही विद्यार्थीनी तेलंगणा येथे राज्य किक बॉक्सिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावित रौप्य पदकाची मानकरी ठरली आहे.या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरावरून मोठे कौतुक होत आहे.
तेलंगणा येथील डॉ.बीबीआर आंबेडकर इंडोअर स्टेडियम-करिमनगर येथे १७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा संपन्न झाली.यावेळी या स्पर्धेत साक्षी हिने आपला सहभाग नोंदवत घवघवीत यश संपादन केले आहे.या यशाबद्दल तिचे महाविद्यालयातील शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात आले.

1

4