पोलिसांना शिवीगाळ, दोघांची निर्दोष मुक्तता…

278
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.०८: पोलिसांना शिवीगाळ करून सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. प्रमोद वसंत वालावलकर व साहिल प्रमोद वालावलकर दोघेही रा. वालावल अशी त्यांची नावे असून सबळ पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात केली. याप्रकरणी ॲड. सुरेंद्र तेली यांचा युक्तिवाद यशस्वी ठरला.

याबाबत अधिक माहिती अशी की, १९ नोव्हेंबरला निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोविंद वारंग हे वालावल येथील विनयभंग केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी गेले असता संशयीतांनी संगमत करून पोलीस स्टाफच्या अंगावर धावत जाऊन शिवीगाळ करून पोलीस अधिकारी श्री. वारंग यांना मारहाण करून त्यांच्या चष्म्याची तोडफोड केली होती त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\