उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर मालवणात महाआघाडीकडून जल्लोष…

438
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २८ :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर शपथ घेताच मालवण शहरात महा आघाडीच्यावतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून, पेढे वाटून शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना तालुका कार्यालय येथे शपथविधी सोहळ्यासाठी मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. त्यावर शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी तालुका व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\