रानडुकरांच्या शिकार प्रकरणी दोन संशयितांना ३० नोव्हेंबरपर्यंत वन कोठडी…

1294
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अनेकांचे धाबे दणाणले ; अन्य काहींचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार- वन क्षेत्रपाल अमृत शिंदे…

मालवण, ता. २८ :
रानडुकरांच्या शिकारीनंतर डुकराच्या मटणाचे  सोपस्कार करत असल्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची वन विभागाने गंभीर दखल घेत आज दोन संशयितांना ताब्यात घेत अटक केली. त्याच्या विरोधात वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना मालवण न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.  सुरेश रामचंद्र मापारी वय-५६ रा. वेरळ, राजाराम अंकुश नेरुरकर(नेरकर) वय-५८ रा. विरण अशी शिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांना कुडाळ पोलिस ठाण्यातील कोठडीत हलविण्यात आले आहे.
     या प्रकरणात अनेकांचा सहभाग असल्याचे व्हिडीओत दिसत असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
     या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू करण्यात आला असून जी नावे तपासात येतील त्यांच्यावरही कारवाई होईल असे वन क्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी स्पष्ट केले.
     रानडुकरांची शिकार करून त्यांचे सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचा एक व्हिडिओ गेले दोन दिवस सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या प्रकाराची माहिती काल वनविभागाला मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेतली. आज याप्रकरणी सुरेश रामचंद्र मापारी व राजाराम अंकुश नेरुरकर या दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना मालवण न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
     वेरली येथील एका विहिरीत १४ रानडुकरे पडली होती. शिकार्‍यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना मारल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानुसार संशयित दोन शिकार्‍यांना ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली वाहने, हत्यारे ताब्यात घेतली जाणार आहेत. अन्य काहींचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे  वनक्षेत्रपाल श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आय. डी. जालगावकर, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे हे तपास करत आहेत.
\