वेंगुर्ले येथे शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा…

2

बँ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे आयोजन

वेंगुर्ले.ता.८: वेंगुर्ले येथील बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे शिवजयंती चे औचित्य साधून जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९-०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचा विषय ” छत्रपती शिवरायांचे आदर्श शेती धोरण” असा आहे व वेळ ८ ते १० मिनिटे इतकी आहे. रोख बक्षीस प्रथम क्रमांक रु. १५००/-द्वितीय रु.११००/-,त्रुतीय रु.७५०/- व उत्तेजनार्थ रु. ३००/-ची दोन बक्षिसे आणि प्रमाणपत्र व चषक असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी श्री. संजय पाटील मोबाईल क्रमांक ९८९०६९४७०९ व श्री सुनील आळवे ९४२१६३११४७ यांच्याशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. विलास देऊलकर यानी केले आहे.

2

4