गणेशोत्सवास सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची वाट मोकळी…

3227
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जिल्हाधिकार्‍यांकडून हिरवा कंदील; दोन्ही डोस बंधनकारक, नसल्यास “निगेटिव्ह रिपोर्ट”

सिंधुदुर्गनगरी ता.२४: गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना अखेर जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यासाठी मात्र दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण नाही त्यांना आरटीपीसीआर चाचणीचे अथवा निगेटिव्ह रिपोर्टचे बंधन असणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली आहे. १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांच्या प्रवेशास आर.टी.पि.सि.आर चाचणी अहवाल आवश्यक राहणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

\