शिरोडा महाविद्यालयाची दिपिका खोबरेकर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम…

399
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला, ता. ३१ : बा. म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालय शिरोडा या महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिपिका राकेश खोबरेकर हिने कै. बाळासाहेब पाटील स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तीचे गावातून अभिनंदन होत आहे.

१३ डिसेंबर रोजी कै. पाटील यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गावातील केरवाडी येथील दिपिका खोबरेकर या विद्यार्थिनीने भाग घेतला होता. तिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. निबंधाचा विषय ‘माझा बाबा” होता. या स्पर्धेत एकूण ७९४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि आनंदाची बाब म्हणजे पूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकवणारी विद्यार्थिनी ही कोकणची आहे.

\