तुळस येथे १० फेब्रुवारीला रांगोळी स्पर्धा…

139
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.०७:
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने अश्वमेध तुळस महोत्सव अंतर्गत १० फेब्रुवारी २०२१ ला श्री वेताळ मंदिर तुळस खरीवाडा येथे सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
तुळस येथील सदर रांगोळी स्पर्धेसाठी संस्कारभारती विषय असून विजेत्यास अनुक्रमे प्रथम पाच क्रमांकास रोख ७००, ५००,३०० व १५० ,१५० प्रत्येकी चषक आणि प्रमाणपत्र व सर्वांना सहभाग प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) व महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विवेक तिरोडकर (९४२०९५५५७९) यांनी केले आहे.

\