दोडामार्गात भाजपाचे “भीक मागो” आंदोलन…

244
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

दोडामार्ग ता.०७: शहरातील विकास कामे करण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीकडे निधी नसल्याने भाजपाच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने “भीक मागो” छेडण्यात आले.तालुक्यातील मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत.तसेच ग्राहकांची वाढीव वीज बिले अद्यापही माफ झाली नाहीत,त्यामुळे या आंदोलनातून जमा झालेले पैसे बांधकाम व विद्युत वितरणला दिले जातील,असे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, संतोष नानचे,संजय विर्नोडकर,पांडुरंग बोर्डेकर,श्री.हडीकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

\