परब मराठा समाजाचा हिरक महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करणार…

7
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दिपक परबः परब बांधवांच्या गाठीभेटी घेण्यासाठी संपर्क अभियानाचे आयोजन…

मालवण ता.०८: गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जोपासून अनेक वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या परब मराठा समाजाचा हिरक महोत्सव यावर्षी विविध उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहीती समाजाचे उपाध्यक्ष तथा प्रसिध्द उदयोजक डॉ. दिपक परब यांनी दिली.
याबाबतची माहीती पदाधिकार्‍यांकडुन देण्यात आली. यावेळी सहसचिव जी.एस परब, राधिका परब, मिलींद प्रभू आदी उपस्थित होते. यात १९मार्च २०२३ शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे सकाळी दहा ते दोन या वेळात महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात सहित सर्व परब बांधवांचा भव्य दिव्य कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच बरोबर मराठा समाजातील महिलांसाठी महिला दिन सुद्धा विविध उपक्रमाने याच दिवशी संपन्न होणार आहे. ..
जुलै २०२३ मध्ये मुंबई नजीक कार्यकर्त्यांचा मेळावा व पावसाळी महा शिबिर घेण्यात येणार आहे. या पावसाळी शिबिरामध्ये सर्व परब बांधवांनी सहभागी होणे गरजेचे आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर १४नोव्हेंबरला मुंबई येथे बालदिन साजरा करण्यात येणार असून यावेळी परब मराठा समाजातील बालकांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. २२ डिसेंबर ला मुंबई येथे परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवाची सांगता मोठ्या धुमधडाक्यात विविध मान्यवरांच्या उपस्थित विविध उपक्रमांनी करण्यात करण्यात येणार आहे.
या परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवा निमित्त इतर समाजातील सर्व ज्ञाती बांधवांना ही समाविष्ट करून घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच भविष्यात परब मराठा समाजातील मुले तसेच इतर समाजातील मुले शैक्षणिक सुविधांपासून कोणीही वंचित राहता कामा नये यासाठी परब मराठा समाज नेहमी पुढे असतो. यापुढेही कोणत्याही समाजातील मुलांनी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी परब मराठा समाजाचे माजी अध्यक्ष कैलासवासी जयवंत परब, विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री अनिल परब, उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब, जी एस परब हे नेहमी पुढाकार घेत असून भविष्यातही या मुलांच्या मागे हे मान्यवर आणि समाज राहणार आहेयाची ग्वाही सुद्धा डॉक्टर दीपक परब यांनी यावेळी दिली. परब मराठा समाजाची परब सहकारी पतपेढी म्हणून कार्यरत असून ही पतपेढी दादर, भांडुप, कणकवली, कुडाळ अशा चार ठिकाणी या पतपेढीच्या शाखा असून या पतपेढीच्या माध्यमातूनही दरवर्षी विविध समाजाभिमुख उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या पतपेढीला 41 वर्षे पूर्ण होत असून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवण्यासाठी ही पतसंस्था परिश्रम घेत आहे.
या पतपेढीच्या माध्यमातून समाजातील गरजूंना वेळोवेळी सुलभ कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले जात आहे. परब पतपेढी आणि परब मराठा समाजाच्या वतीने समाजातील गरजवंत गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येते.
या हिरक महोत्सवाचे अवचित्य साधून परब मराठा समाज व इतर सर्व समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ६० गुणवंतांचा यथोचित सन्मान करणार आहे.
या सर्वांना भव्य दिव्य अशा अनोख्या कार्यक्रमात परब बांधवांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत परब मराठा समाजाचा आगळावेगळा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
याबरोबरच सर्व लहान थोर घटकांना एक व्यासपीठ मिळावे म्हणून संपूर्ण वर्षभर विविध प्रकारच्या शालेय व शाळाबाह्य राज्य स्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी घेण्यात येणार आहेत. याबाबतचे अधिकृत माहिती मागवून प्रसिद्ध केली जाईल. परब मराठा समाज हा कोणत्याही पक्षाचे लेबल न वापरता गुण्यागोविंदाने काम करत आहे. भविष्यात होणारा हीरक महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होण्यासाठी परब मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी, तसेच समाजाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अनिल परब, कार्याध्यक्ष जगदीश परब, सरचिटणीस जी एस परब, खजिनदार शरद परब, जनरल सेक्रेटरी शैलेंद्र परब आणि सर्व सदस्य प्रयत्न करत आहे.
परब मराठा समाजाच्या हीरक महोत्सवात परब मराठा समाजातील सर्व बांधवांनी हितचिंतक व सर्व समाजातील सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परब मराठा समाजाच्या वतीने उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब, सहसचिव जीएस परब आणि सर्व सदस्यांनी केले आहे..

\