आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेतकर्‍यांचा आर्थिक विकास निश्चित…

8
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ.संजय सावंत; तळवडे येथे शेतकरी व बागायतदारांचा मेळावा उत्साहात संपन्न…

सावंतवाडी,ता.०८: शेतकरी व बागायतदारांनी आपल्या आर्थिक आणि सर्वांगिण विकासासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे आणि त्याबद्दल योग्य ती माहिती घ्यावी आणि आपले उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले. सहयोग ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मेळाव्याला भेट देवून उपस्थित शेतकरी व बागायतदारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मेळाव्याचे उद्घाटन राणी श्रीमंत सौ. शुभदा देवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कोकण कृषी विद्यापीठ संचालक प्रमोद सावंत, तळवडे शिक्षण मंडळचे बाळा पेडणेकर, सरपंच तळवडे विनिता मेस्त्री, उपसरपंच प्राजक्ता गावडे, प्राचार्य डी. एस. भारमाल, एम. कुलकर्णी, कृषि अधिकारी यशवंत गव्हाणे, संहयोग ग्रामविकास मंडळ माजगाव अध्यक्ष दिलीप गोडकर, सचिव मोतीराम टोपले , खजिनदार हनुमंत देसाई, तसेच तळवडे श्री जनता विद्यालय प्राचार्य प्रतापराव देसाई, तसेच या कार्यक्रमवेळी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, रविंद्र परब, माजी उपनगरध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नेमळे कौल कारखाना अध्यक्ष राऊळ, बाळा जाधव, राजाराम गावडे, बंड्या परब, कुंदा पै, दादा परब, विजय नाईक आदी मान्यवर व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

\