सिंधुदुर्गात येत्या काही वेळात वादळी पावसाची शक्यता…

1582
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काही वेळात ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ तासात घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असे आवाहन मुंबई हवामान खात्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केले आहे. जिल्ह्यात अवकाळी पाऊस दाखल झाला आहे. रोज सायंकाळी पाऊस आपली हजेरी लावतो, याच पाश्र्वभूमीवर आज वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

\