सावंतवाडीतील वीज समस्येच्या विरोधात सर्वपक्षियांचा “एल्गार”…

529
{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी; ३० तारखेपुर्वी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी…

सावंतवाडी,ता.२४: शहरातील वीज समस्येच्या विरोधात आज सर्वपक्षियांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात “एल्गार” पुकारला. विजेच्या समस्या असताना अधिकारी मात्र सुशेगाद आहेत, असा आरोप करीत काम करायला जमत नसेल तर बदल्या करून घ्या, येथून निघून जा, असा सल्ला संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी ३० तारखेपुर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय, तोडगा काढण्यात यावा, अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी आमदार राजन तेली यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

काल सावंतवाडीत ८ तासांपेक्षा जास्त वेळ विज खंडित असल्या कारणाने येथील नागरिक संतापले होते. दरम्यान आज त्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला घेराव घालत उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अशोक दळवी, सिताराम गावडे, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, प्रवीण सूर्यवंशी, आनंद नेवगी, रवी जाधव, देविदास गवंडे, बंड्या तोरस्कर, तारकेश सावंत, दत्ता सावंत, दिपाली सावंत, विशाल बांदेकर, शशिकांत गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी तेली म्हणाले की, शासनाकडून निधी येऊन सुद्धा जनतेला केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे. एसी अधिकाऱ्यांसमवेत या अगोदर दोन वेळा बैठका घेऊन देखील आज ही परिस्थिती उद्भवली आहे. तालुक्यात गेले दहा दिवस विजेचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे याचा परिणाम आंबोली सारख्या भागातील पर्यटनावर होत आहे याला महावितरण जबाबदार आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.

यावेळी तेली यांनी महावितरणाचे एसी अधिकारी श्री. पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधून जाब विचारला व येत्या ३० मे ला बैठकीचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. अधिकारी आयोजित बैठकांमध्ये आपल्या अडचणी आमच्यासमोर मांडत नाहीत त्यामुळे या गोष्टी घडून येतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे तुम्हाला जमत नसेल तर, येथून बदली करून निघून जा असा सल्ला तेली यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे यापुढे अधिकारी शहाणे नाही झालेत तर नागरिकांकडून होणाऱ्या उद्रेकाला त्यांना सामोरे जावे लागेल. किनारपट्टी भागांमधून ज्याप्रमाणे अंडरग्राउंड लाईट जाते त्याचप्रमाणे इथल्या शहरांमध्ये देखील ही सुविधा व्हायला हवी व लोकसंख्येच्या निकषांप्रमाणे या ठिकाणी वायरमनची नेमणूक झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

\