सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी सचिन हुंदळेकर…

2

फुलचंद मेंगडेंना देवगडचा कार्यभार; शशिकांत खोतांच्या निवृत्तीनंतर रिक्त होते पद..

सावंतवाडी ता.०३: येथील पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी जिल्हा पोलिस विशेष शाखेचे निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हा कार्यभार गेले काही दिवस फुलचंद मेंगडे यांच्याकडे देण्यात आला होता.मात्र आता त्यांना देवगड पोलिस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला आहे.परंतु हुंदळेकर यांना दिलेला कार्यभार कायम,की तात्पुरता ही माहिती मिळू शकली नाही.
येथील पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत ३१ तारखेला निवृत्त झाले.तत्पूर्वी ते रजेवर गेले होते.त्यांच्या अनुपस्थित पोलिस निरीक्षक पदाची जबाबदारी मेंगडे यांच्याकडे देण्यात आली होती.दरम्यान यांच्याकडे आता देवगड पोलीस ठाण्याच्या कार्यभार देण्यात आला आहे.तर या ठिकाणी हुंदळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

10

4