केरळात मान्सूनची “एन्ट्री”,१० जूनपर्यंत राज्यात दाखल होणार…

2

मुंबई ता.०३: केरळात अखेर आज मान्सूनची एन्ट्री झाली.दरम्यान १० जून पर्यंत पाऊस राज्यात दाखल होईल,असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

दरवर्षी केरळात पाऊस दाखल नंतरच राज्यात पावसाला सुरुवात होते.त्यामुळे शेतकरीसुद्धा केरळात पाऊस केव्हा दाखल होतो,याची वाट पाहत असतात,,त्यानंतरच शेतीच्या मुख्य हंगामाला सुरुवात होते.सद्यस्थितीत कोकणात अधून-मधून पाऊस कोसळत आहे.मात्र शेती कामांना अद्याप हवी तशी सुरुवात झाली नाही.त्यामुळे १० जून पर्यंत पाऊस दाखल झाल्यानंतर येथील शेती व्यवसाय जोमात सुरू होणार आहे.

1

4