स्वतः व्यवसायिक असताना पुंडलिक दळवींचा व्यापाऱ्यांना विरोध कसा…?

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अजय गोंदावले; “ते” स्थानिक नसल्यामुळे कमळ त्यांना कळणार नाही…

सावंतवाडी,ता.०८: स्वतः व्यापारी असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व्यापार्‍यांच्या विरोधात कसे? असा सवाल करीत फुटपाथवर भरणार्‍या बाजाराच्या विरोधात नागरीकांची तक्रार नाही? मग त्यांच्या पोटात का दुखते? असा सवाल भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केला आहे. कमळे ही चिखलातच उगवतात ते दळवींना माहीती नाही, हे आमचे दुर्दैव आहे. ते स्थानिक नसल्यामुळे त्यांना बहुधा ते समजू शकणार नाही. त्यामुळे याबाबत अधिक न बोललेच बरे, असा ही चिमटा गोंदावळे यांनी काढला आहे.

काल येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. दळवी यांनी सावंतवाडी पालिकेतील सत्ताधार्‍यांवर टिका केली होती. याला श्री. गोंदावळे यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आठवडा बाजाराला अनेक ठिकाणी विरोध होत होता. काही ठिकाणी नागरीक आणि व्यापार्‍यांना त्रास सहन करावा लागत होतो. त्यामुळे नगराध्यक्ष संजू परब यांनी तो बाजार फुटपाथवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता कोणालाच अडचण नाही उलट नागरीकांना सुध्दा त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे अशा गोष्टींचे समर्थन करणे सोडुन दळवी व्यापार्‍यांनाच विरोध करत असतील तर ते चुकीचे आहे, गोंदावळे म्हणाले आहे.

\