भाजप चित्रपट आघाडीच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी मोहन गवस…

0
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा, ता.२५: भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडीच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी मडुरा येथील मोहन गवस यांची निवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
कणकवली येथे भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजप चित्रपट आघाडी कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष तेली, जिल्हा सचिव यशवंत माधव, उपाध्यक्ष अंकित प्रभू आजगावकर, विशाल खडपकर, तालुका उपाध्यक्ष गोविंद प्रभू उपस्थित होते.
सावंतवाडी भाजप चित्रपट आघाडी तालुका अध्यक्ष पदी मोहन गवस यांची निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष पदी सातार्डा येथील गोविंद प्रभू, सरचिटणीस अंकित आजगावकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या मराठी आणि मालवणी कलाकारांना कमी संधी दिली जाते. सक्षम व होतकरू कलाकारांना योग्य प्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी चित्रपट आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष मोहन गवस यांनी सांगितले. सावंतवाडी तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

\