दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण

802
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी/पंकज मोरे : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आज तालुकावासियांना आला. तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात एका तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनरला अपघात झाला. या अपघातात चालक बालबाल बचावला आहे. त्याला दुखापत झाली असून त्याला येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी ७. वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चालक उदयसिंह आपल्या ताब्यातील कंटेनर(एमएचआर ५५-एम-५९४९) हरिव्दार(उत्तरप्रदेश) येथून कुडाळला होंडा कंपनीच्या मोटारसायकल घेऊन जात असताना करुळ घाटात एका तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटून दरी कडील संरक्षक कठड्याला अडकून राहिला. या अपघातात चालक बालबाल बचावले आहे.
दरम्यान करुळ चेकपोस्टवर ड्युटीवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत इतर वाहन चालकांच्या मदतीने अपघातात अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. त्याला दुखापत झाली असून त्याला येथील ग्रामीण रूग्णालयात हलविले आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.

\