सावंतवाडी न्यायालयात हजर; आंबे काढण्यावरुन झालेल्या वादानंतर घडलेला प्रकार…
सावंतवाडी,ता.०७: सातार्डा-साटेली येथील पोलिस पाटील विलास रविंद्र साटेलकर यांच्यावर बंदूक रोखून हल्ला केल्याप्रकरणी संशयित शंकर रमाकांत सावंत याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हा प्रकार तीन महिन्यांपूर्वी घडला होता. दरम्यान त्याला काल सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. तर आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जमिन जागेच्या कारणावरुन संशयित सावंत याचे साटेलकर यांच्या सोबत वाद होते. यातून ते आंबे काढण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला होता. या प्रकरणी शंकर याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शंकर याने अंतरिम अटकपुर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन केला होता. मात्र त्या ठिकाणी जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर त्याला काल अटक करण्यात आली. तर आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.