शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्गात…

9
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा घेणार आढावा; प्रशासनाच्या उपस्थितीत बैठक…

सावंतवाडी,ता.११: शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर बंडखोर गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर प्रथमच उद्या सिंधुदुर्गात येणार आहेत. यावेळी ते अतिवृष्टी व पूर परिस्थिती संदर्भात आढावा घेण्याबरोबर सर्व तहसीलदार, वीज मंडळ, प्रांताधिका-याशी चर्चा करून काही निर्णय घेणार आहेत. याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली.

यावेळी संध्या ४.०० वा . अतिवृष्टी पुरपरिस्थिती व संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यात प्रांताधिकारी-सावंतवाडी, तहसिलदार-वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग , कार्यकारी अभियंता सार्व. बांधकाम, कार्यकारी अभियंता जि. प. बांधकाम, मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरिषद, मुख्य अभियंता बांधकाम नगरपरिषद- सावंतवाडी यांच्यासमवेत ही बैठक होणार आहे. तसेच कार्यकारी अभियंता, म. रा. विद्युत मंडळ -कुडाळ, विभाग नियंत्रक एस टी महामंडळ- कणकवली, एस टी डेपो मॅनेजर- सावंतवाडी, स्थळ तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. तर संध्या ४.३० वा . सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुका दक्षता समिती आढावा बैठक मा. तहसिलदार वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत येथील तहसीलदार कार्यालयात होणार आहे. त्यानंतर संध्या ५.३० वा. श्री साईबाबा पालखीचे श्रीधर अपार्टमेंट येथे आगमन व पूजा.

\