क्षयरोग ग्रस्तांना चांगला आहार मिळण्यासाठी शासनाची “कम्युनिटी सपोर्ट टू टीबी” रुग्ण योजना…

6
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.२३: टी बी आजार झालेल्या रुग्णांना चांगला आहार मिळण्याची गरज आहे. यासाठी शासनाने कम्युनिटी सपोर्ट टू टी बी रुग्ण ही योजना अमलात आणली आहे. यातून नि- क्षय मित्र हे ॲप तयार करण्यात आले असून याद्वारे आहाराची गरज असलेल्या रुग्णांना समाजातील दानशूर व्यक्तींनी दत्तक घेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशिक्षण अधिकारी डॉ हर्षल जाधव यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी दालनात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ जाधव यांनी हे आवाहन केले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ प्रशांत सौदी, किशोर लाड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ जाधव यांनी केंद्र शासनाने टी बी निर्मूलनसाठी टी बी रुग्णांना सहाय्य करण्याचा संकल्प केला आहे. प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियान यासाठी राबविण्यात येत आहे. त्याद्वारे २०१५ मध्ये असलेल्या रुग्णांच्या तुलनेत २०२५ मध्ये ८० टक्के रुग्ण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

\