कुमक कमी, तरी ३४ वाहनांसह सव्वातीन कोटीचा मुद्देमाल पकडला…

7
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग”एक्साईजचा” दावा; कारवाईच्या आश्वासनामुळे मनसेचे आंदोलन “स्थगित”…

बांदा,ता.१२: बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत तब्बल ४८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३४ वाहनासह ३ कोटी २८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सातत्य राहणार आहे, असे लेखी आश्वासन एक्साईज अधिकाऱ्याने दिल्यामुळे मनसेने पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान इन्सुली तपासणी नाक्यावर असलेली कर्मचा-यांची कुमक कमी पडत आहेत. तरीही आम्ही सातार्डा तळवणे,आरोंदा,ओटवणे पोटवडीदा या ठिकाणी अधिकची नाकी उभारले असून बेकायदा दारूवर आमचे लक्ष आहेत, असेही आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैद्य दारू वाहतूक विरोधात मनसे कडून आज येथील इन्सुलि तपासणी नाक्यावर डबे वाजवा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत आमच्या खात्याअंतर्गत कारवाई सुरू आहे. त्यामुळे आंदोलन करू नका, अशी विनवणी संबंधित पदाधिकाऱ्यांना केली. त्यानंतर मनसेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

\