वेंगुर्ल्यातील अखिल संघाच्या २५ शिक्षकांनी केला शिक्षक समिती मध्ये प्रवेश..

20
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.१४: तालुक्यातील अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या २५ आघाडीच्या पदाधिकारी शिक्षकांनी एकनाथ जानकर यांचे नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक समितीमध्ये जाहिर प्रवेश केला. हा कार्यक्रम साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे संपन्न झाला.

यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस सचिन मदने, जिल्हा शिक्षक नेते नंदकुमार राणे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, लवू चव्हाण, माजी राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, सचिव प्रसाद जाधव, शिक्षक नेते संतोष परब, सेवानिवृत्त शिक्षक आनंद पेडणेकर, विजय सावंत, माजी संचालक त्रिंबक आजगावकर, सिताराम नाईक, किरण मुडशी, संचालक विजय सावंत, स्वामी सावंत, दत्ता तवटे, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष तुषार आरोसकर, एकनाथ जानकर, आबा झोरे, कर्पूरगौर जाधव, काका जोशी, राजू वजराटकर आदी उपस्थित होते.

वेंगुर्ला तालुक्यात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न एकनाथ जानकर व मित्रपरिवार शिक्षक बांधवांनी केला तरीही वारंवार संघाच्या जेष्ठ पदाधिकारी-सदस्य यांनी अन्याय केला याला वाचा फोडण्यासाठी एकनाथ जानकर व 24 शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक समितीमध्ये जाहिर प्रवेश केला.

अखिल संघाचे २५ पदाधिकारी-सदस्यांचा शिक्षक समितीत प्रवेश- एकनाथ जानकर, सरोज जानकर,कर्पूरगौर जाधव, रामचंद्र(आबा) झोरे, रवी गोसावी, विजय मस्के, सागर लाखे, विलास गोसावी, वैदेही गोसावी, जयंत (काका) जोशी, पंचफुला मोरे, समिर तेंडोलकर, गुंडू शेळके, पांडुरंग चिंदरकर, अनिशा झोरे,अमोल आग्रे, वृशाली मोहिते, संजीवनी ढांस, राजाराम लोटे, दिपमाला जाधव, विश्वनाथ जगताप, श्रीम सुजाता शिवगण, श्री संतोष गोसावी, आदींनी शिक्षक समितीमध्ये जाहिर प्रवेश केला. प्रामाणिक काम करूनही अवहेलना केल्याने शिक्षक समितीत प्रवेश एकनाथ जानकर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्ल्यात वाढवताना प्रामाणिक प्रयत्न केले. अनेक शिक्षक संघटनेत दाखल झाले.दोन वेळा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणूकीत मताधिक्य मिळवत संघटनेची ताकद निर्माण केली परंतू काही ज्येष्ठ नेत्यांनी कायमच अवहेलना करत अन्याय केला. याला वाचा फोडण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी शिक्षक समितीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आज जाहिर प्रवेश शिक्षक समितीत केला असल्याचे श्री एकनाथ जानकर यांनी व्यक्त केले.

काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शिक्षक समितीत नेहमी सन्मान होतो. जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, प्राथमिक शिक्षक समिती ही चळवळ अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेली ६९ वर्षे राज्यातील अग्रगण्य संघटना म्हणून कार्यरत असून फोडाफोडीचे राजकारण कधीही शिक्षक समिती करत नाही. परंतू संघटनेच्या कार्यावर प्रभावित होऊन प्रवेश करणाऱ्या शिक्षक कार्यकर्त्यांचा शिक्षक समिती नेहमीच योग्य सन्मान करते असे गौरवोद्गार जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी व्यक्त करत एकनाथ जानकर व सहकारी शिक्षकांचे शिक्षक समितीत स्वागत करत असल्याचे स्पष्ट केले.

राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर यांची समन्वयाची भूमिका निर्णायक एकनाथ जानकर व सहकारी शिक्षकांवरील झालेला अन्याय शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचे पर्यत आल्यानंतर कोरगावकर यांनी उत्तम समन्वयकाची भूमिका बजावत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी व वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी यांचेशी सुसंवाद साधत शिक्षक समिती प्रवेश कार्यक्रम बाबत निर्णायक भूमिका वटवली. श्री कोरगावकर हे मंत्रालय मुंबई येथे असल्याने त्यांनी आजच्या कार्यक्रमास फोनवरून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी संचालक त्रिंबक आजगावकर तर आभार तालुकाध्यक्ष सिताराम लांबर यांनी केले.

\