कोलगाव येथे ट्रकची शिवशाहीला धडक, ८ प्रवासी जखमी…

28
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१५: सिमेंट वाहतूक करणार्‍या ट्रकने समोरुन ठोकर दिल्याने कोलगाव येथे शिवशाही बसला अपघात झाला आहे. यात ८ प्रवासी आणि दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आंधळ्याचा चढाव येथे सावंतवाडी-कुडाळ मार्गावर घडला. सरिता महेंद्र माणगावकर (६०) तळवडे, गणेश महेंद्र सुतार (५५) पुणे, डॉ. निरंजन शर्मा (२४) सावंतवाडी, शितल शांता कमलेकर (६२) तळवडे, विजयमाला विष्णुदास धुरी (७८) सोनवडेपार, जाकीयाबी अब्बास शेख (४७) मालवण अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

\