राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल जाधव… 

28
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.१२: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी विशाल बाबल्या जाधव यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर पक्षाने संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी पक्षाकडून नवनियुक्त्या करण्यात येत आहे. जिल्ह्यात नव्याने संघटना बांधणी सुरू झाली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी विशाल जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

जाधव हे मुळचे कोळपे येथील आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. गावात सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना जिल्ह्यातील युवकांचे नेतृत्व करण्याची पक्षाने संधी दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.

निवडीनंतर बोलताना श्री. जाधव म्हणाले, पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडीन. जिल्ह्यातील युवकांचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी भविष्यकाळात काम करेन. सदैव पक्षहितासाठी कार्यरत राहू असा विश्वास व्यक्त केला.

\