प्रफुल्ल सुद्रिक यांच्या गाडीला ओरोस येथे अपघात…

18
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तिघे बालंबाल बचावले; गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान…

सिंधुदुर्गनगरी,ता.२८: अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांची कार पलटी होवून अपघात झाला आहे. त्यात त्यांच्यासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडली. श्री. सुद्रिक हे आपल्या सहकाऱ्यांसह ओरोस येथून कणकवलीच्या दिशेने जात होते. यावेळी हॉटेल गंगाई समोर गाडी पलटी होऊन अपघात झाला. यावेळी त्यांच्यासमवेत मधुकर शिर्के आणि अमित गुरव हे कार्यकर्ते होते. मात्र सुदैवाने तिघेही बालंबाल बचावले.

\