कणकवली पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष पवार यांचे निधन…

17
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता. ०८ : येथील पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष दादासाहेब पवार (वय ५२) यांचे आज दुपारी ४ वा. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले. सुभाष पवार हे आज कणकवली पंचायत समितीत कार्यरत असताना दुपारी ते घरी जेवण्यासाठी जानवली येथे गेले. मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना मी घरी असून, अस्वस्थ वाटत असल्याबाबत फोन केला. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी जानवली येथून त्यांना आणून कणकवलीतील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
श्री. पवार हे मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील होते. गेली अनेक वर्ष ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, वैभववाडी, देवगड,कुडाळ आदि ठिकाणी कार्यरत होते. कृषी विस्तार अधिकारी या पदावर त्यांनी अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यात काम केले होते. वैभववाडी मध्ये प्रभारी गट विकास अधिकारी म्हणूनही ते काही काळ कार्यरत होते. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुली असा परिवार आहे.

\