पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा…

3
2
Google search engine
Google search engine

देवगड तालुका पत्रकार संघाची तहसीलदार प्रशासनाला निवेदनाव्दारे मागणी…

देवगड ता.१७: पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा. पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगतीने न्यायालयामार्फत चालविणे आणि पाचोऱ्या चे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देवगड तालुका पत्रकार समिती च्या वतीने देवगड तहसिलदार तहसीलदार आर.जे.पवार यांना सादर करण्यात आले.

यावेळी पत्रकार समिती चे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र मुंबरकर,प्रशांत वाडेकर,संतोष कुळकर्णी,सुरज कोयंडे,राजीव पडवळ,वैभव केळकर आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यत आम्हां पत्रकारांच्या भावना कळवा अशी विनंती यावेळी पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आली आहे.