कणकवली तालुक्‍यातील घरफोडी प्रकरणी दोन महिलांना अटक…

20
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.0२ : तालुक्‍यातील सांगवे शिवाजीनगर आणि हुंबरट येथील बंद बंगले फोडल्‍या प्रकरणी दोन महिलांना कणकवली पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. या दोघींना न्यायालयात हजर केले असताना त्‍यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्‍या संशयित आरोपींमध्ये अंजली गणेश कुबडे (वय २९) पूजा विश्‍वनाथ गावडे (वय २२) यांचा समावेश आहे.
तालुक्‍यातील सांगवे येथील वासुदेवानंद बंगला तसेच हुंबरट येथील बंद घर फोडल्‍याच्या घटना ऑक्‍टोबर महिन्यात उघडकीस आल्‍या होत्या. प्रकरणाचा तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करत आहेत. हा तपास सुरू असताना
हरकूळ बुद्रूक येथील अंजली कुबडे यांचा चोरीत सहभाग असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काल त्‍यांना ताब्‍यात घेऊन तपास केला असता कुबडे यांनी सांगवे येथील बंगल्‍यातील चोरीची कबूली दिली. तर या प्रकरणात संशयित आरोपी पूजा विश्‍वनाथ गावडे (वय २२) या महिलेचाही सहभाग असल्‍याची माहिती कुबडे हिने दिली. त्‍यानुसार पूजा गावडे हिला देखील आज पोलिसांनी ताब्‍यात घेतले. या दोघींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

\