Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायण राणे; विशाल परबांचे कौतुक, रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार…
कणकवली,ता.०३: भाजपचे युवा नेते तथा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या “सिंधूरत्न जॉब फेअर”च्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळत असेल तर आपल्याला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिली. दरम्यान विशाल यांचे व्यक्तिमत्व नावा प्रमाणे विशाल आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला आपण नक्कीच उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१२ जानेवारीला सावंतवाडी जिमखाना मैदान येथे विशाल परब यांच्या माध्यमातून सिंधूरत्न जॉब फेअर या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे निमंत्रण देण्यासाठी आज त्यांनी कणकवली येथे जाऊन राणे यांची भेट घेतली. यावेळी राणे बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये, प्रितेश राऊळ, भूषण आंगचेकर उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.
\