बबन रेडकर लेदर बॉल गौरव क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन…

37
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ०३ : तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित बबन रेडकर लेदर बॉल गौरव क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ बोर्डिंग मैदान येथे मालवण एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ सामंत यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू यष्टीरक्षक रामचंद्र शेटये, डॉ. शिरीष कदम यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून करण्यात आले.
यावेळी पपू परब, नंदन देसाई, बबन रेडकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जॉन नरोन्हा, जयंत गवंडे, पिंकू मोरे, विलास परुळेकर, मालवण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी विजय कामत, दिगंबर सामंत, माजी नगरसेवक नितीन वाळके, बाबु गांगनाईक, अनुष्का आंबेरकर, विक्रम मोरे, नीलकंठ मालणकर, झहीर शेख, जगदीश नेवाळकर, रिझवान शेख, सुशील शेडगे, दिपक धुरी, संदीप रुद्रे, श्याम वाक्कर, जिल्हा क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणी सदस्य रघु धारणकर, संतोष केनवडेकर, श्याम वाक्कर, लारा मयेकर आणि मैदानाचे क्युरेटर धर्मेंद्र कुमार, संजय राऊत, श्री. गावकर, दिपू, धनराज उपस्थित होते. यावेळी नंदन देसाई, जॉन नरोन्हा, गुरुनाथ सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.
तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित स्पर्धा ३ जानेवारी ते ६ जानेवारी या कालावधीत होत असून मालवण तालुका मर्यादित शहरी चार आणि ग्रामीण चार असे आठ संघ सहभागी झाले आहेत.

\