मालवणात २६ जानेवारीला तिरंगा पदयात्रा…

180
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अभाविपचे आयोजन ; नागरिकांनी, तरुणांनी सहभागी व्हावे…

मालवण, ता. २४ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग शाखा मालवणच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथुन राजकोट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ६५० फुट राष्ट्रध्वजाची तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य शिवाजी भावसार यांनी हॉटेल ओयासिस येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शहर मंत्री शुभम सकपाळ, कार्यक्रम प्रमुख मेघल डिसोझा आदी उपस्थित होते. श्री. भावसार म्हणाले, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सकाळी ९.३० वाजता स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथुन राजकोट छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत ६५० फुट राष्ट्रध्वजाची तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत मालवण शहरातील महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. युवकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावे या हेतुने या तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या तरुणांमध्ये सजग भारतीय नागरिक असल्याची भावना या पदयात्रेतुन निर्माण होईल. देशातील महापुरुषांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

\