माडावरून पडल्याने वायरी मोरेश्वरवाडीतील तरुण जखमी…

404
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २२ : वायरी मोरेश्वरवाडी येथील हार्दिक अंकुश ढोके (वय-२५) हा तरुण माडावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. हार्दिक याला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
वायरी मोरेश्वरवाडी येथे राहणारा हार्दिक ढोके हा माडावर चढायच्या मशीनच्या साहाय्याने वाडी मधीलच एका माडावर नारळ काढण्यासाठी चढला होता. मात्र, मशीनवरून निसटल्याने हार्दिक माडावरून जमिनीवर कोसळला. उंचावरून कोसळल्याने हार्दिक हा जबर जखमी होऊन त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. यावेळी स्थानिक नागरिक नानू सावजी, अर्जुन मोंडकर, कमलेश मोंडकर, देवानंद मोंडकर, नंदू सावजी, हार्दिकचा भाऊ रोहित ढोके यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ झालेल्या हार्दिक याला नानू सावजी यांच्या रिक्षामधून तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यावर अधिक उपचारासाठी हार्दिक याला दुपारी रुग्णवाहिकेतून गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

\