वादळी पावसाचा फटका, माडखोलात घरावर झाड कोसळून नुकसान…

312
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२४: तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे माडखोल-नमसवाडी येथील स्नेहल संजय राजे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले, यात त्यांचे सुमारे ६० ते ७० हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सौ. राजे यांनी तलाठी श्री. राऊळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबतची कल्पना दिली. दरम्यान आज पहाटेपासून ग्रामस्थ झाड हटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सौ. राजे यांचे दोन्ही मुलगे पुण्यात शिक्षणासाठी असल्यामुळे त्या एकट्याच घरामध्ये राहतात. काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान त्या घरात काम करत असताना ही घटना घडली. दरम्यान आज सकाळपासून येथील ग्रामस्थ बापू म्हालटकर, शैलेश लातये, अमोल लातये, शुभम सावंत, संजय कोठावळे, अक्षय लातये, डुबाजी म्हालटकर, अमोल लातये, चंद्रकांत मेस्त्री, सुरज लातये, वागो वरक हे झाड हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

\