दगडाच्या बेकायदेशीर खाणि बंद करा,…अन्यथा हरित लवादाकडे दाद मागू…

110
2
Google search engine
Google search engine
Google search engine

साई कल्याणकर; सावंतवाडीच्या तहसीलदारांना इशारा, महसूल विरोधात नाराजी….

सावंतवाडी,ता.२४: निगुडे, इन्सुली, वेत्ये भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर काळ्या दगडाच्या खाणीवर ८ दिवसात योग्य ती कारवाई करावी, अन्यथा सावंतवाडी तहसीलदारांच्या विरोधात हरित लवादाकडे याचिका दाखल करू, असा इशारा बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी दिला आहे.

इन्सुली, वेत्ये, निगुडे आदी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत खाणी करून त्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. यात महसूल यंत्रणेचा हात असल्याचा संशय नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार तात्काळ बंद करावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे अनेकांकडून करण्यात आली आहे. परंतु याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे येत्या ८ दिवसात याबाबत योग्य ती भूमिका घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा हरित लवादाकडे दाद मागू, असा इशारा श्री. कल्याणकर यांनी दिला आहे. त्याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.

\