होडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विशाल परब वेंगुर्ल्यात…

544
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२४: येथील बंदरात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज त्या ठिकाणी भेट दीली. यावेळी लवकरात- लवकर मदत कार्य करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. आवश्यक असल्यास आपण भाजपाच्या माध्यमातून सहकार्य करण्यास तयार आहोत, असा शब्द त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

वेंगुर्ला येथे समुद्रात बर्फ घेऊन जात असलेली होडी बुडल्यामुळे ४ कामगार समुद्रात बेपत्ता झाले आहेत. त्यातील अन्य तिघेजण पोहत किनाऱ्यावर पोहोचले. बेपत्ता असलेल्या तिघातील एकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना समजल्यानंतर श्री. परब यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी धाव घेतली व लवकरात-लवकर मदतकार्य मिळावे यासाठी प्रशासनाशी चर्चा केली.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, किसान मोर्चाचे बाळु प्रभु, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, मनोहर तांडेल, मच्छिमार सेलचे वसंत तांडेल, दादा केळुसकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, प्रमोद वेर्णेकर आदी उपस्थित होते.

\