जानवली अपघातातील कार चालकाला जामीन मंजूर…

220
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पादचारी मृत्यू प्रकरण; पुणे निगडी येथे घेतले होते ताब्यात…

कणकवली, ता.२४ : पादचाऱ्याला धडक देऊन पुणे येथे पसार झालेल्‍या कार चालकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अोंकार दशरथ कोरडे (रा.पुणे, निगडी) असे त्‍या कार चालकाचे नाव आहे. कणकवली पोलिसांनी त्‍याला काल (ता.२३) पुणे येथून ताब्‍यात घेतले होते.

जानवली येथील मुंबई गोवा महामार्गावरून चालणारे पादचारी अनिल कदम याना अज्ञात कारने जोरदार धडक दिली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचालक पळून गेला. सदर घटनेबाबत कदम यांच्या भावाने अज्ञात कार चालकाविरुद्ध फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार चालकाविरुद्ध भा.दं.वी. कलम ३०४(अ), २८९,३३७,३३८ व मोटर व्‍हेईकल ॲक्‍ट कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.

अखेर कणकवली पोलिसांनी दिनांक २३ मे रोजी निगडी – पुणे येथून कारसहित संशयित आरोपी ओंकार दशरथ कोरडे (पुणे) याला अटक केली. पोलिसांनी आरोपीस कुडाळ येथील प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांचे कोर्टात हजर करुन आरोपीची दोन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. परंतु आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत आरोपीचा २० हजार रुपये रक्कमेच्या सशर्थ जामीनावर मुक्तता केली. साक्षीदारांवर दबाव आणू नये व तपासकामात अडथळा अणू नये तसेच पोलिसांना तपासकामात सहकार्य करावे अशा अटीवर आरोपीस जामीन मंजूर करणेत आला. आरोपीच्यावतीने ॲड.अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.

\