नाटळ ग्रामसभेत जोरदार हाणामारी, जखमी उपजिल्हा रुग्णालय दाखल…

1986
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.०३: तालुक्यातील नाटळ ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये आज जोरदार राडा झाला. यामध्ये काही जण जखमी झाले असून, दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात जखमी झालेल्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणण्यात आले आहे. याबाबत अद्याप अधिकृत तक्रार दाखल नसली तरी यापूर्वी झालेल्या वादाची याला किनार असल्याचे समजते. या मारहाण घटनेत ग्रामपंचायत मधील काही खुर्च्यांची देखील मोडतोड झाल्याचे समजते. या मारहाणीनंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नाटळ ग्रामपंचायत ची ग्रामसभा सुरू असताना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

\