दिव्यांग महिलेला सावंतवाडी पालिका कर्मचाऱ्यांकडून त्रास…

276
2
Google search engine
Google search engine
Google search engine

परप्रांतीयांचे लाड, मग स्थानिकांवर अन्याय का? स्वप्निल लातयेंचा सवाल…

सावंतवाडी,ता.०३: येथील बस स्टॅन्ड परिसरात आपल्या उदरनिर्वाहासाठी विविध जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या भारती बानावलेकर या दिव्यांग महिलेला येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जागा खाली करण्यासाठी नाहक त्रास दिला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष स्वप्नील लातये यांनी केला आहे.
दरम्यान परप्रांतीय व्यावसायिकांना सावंतवाडी शहरात व्यवसाय करताना कोण विचारत सुद्धा नाही. मात्र येथील स्थानिक छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या दिव्यांग महिलेला त्रास देणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, बानावलेकर या येथील बस स्टॅन्ड परिसरात फळे, फुलांचे हार, भाजीपाला अशा वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र वेळोवेळी येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना जागा खाली करण्यासाठी नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे एखाद्या दिव्यांग महिलेला अशी वागणूक देणे पूर्णतः चुकीचे आहे. दरम्यान पुन्हा असा प्रकार घडल्यास राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे पदाधिकारी गप्प बसणार नाही, असा इशारा लातये यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

\