वेंगुर्लेत  शिवसेनेकडून नारायण राणेंच्या विजयाचा जल्लोष…

94
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.०४: रत्नागिरी-सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तालुका शिवसेनेच्या वतीने कॅम्प येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी लाडू वाटून व फटाके फोडून घोषणा देत जल्लोष करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम, युवा शहरप्रमुख संतोष परब, महिला शहरप्रमुख ॲड.श्रद्धा परब , संजय परब , सुशील परब, बाळा  परब, सिल्वान डिसोजा, किरण कुबल , संजय परब, भाऊ वालावलकर , आपा मांजरेकर , गजानन गावकर, मनी रेवणकर , देविदास वालावलकर , मनाली परब , रसिका राऊळ , मनाली गोळम, संजना पिंगुळकर , गीतांजली गावकर , पुंडलिक हळदणकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. येरम म्हणाले की, नारायण राणे यांनी या केलेली विकासकामे यामुळे ते प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही मतदारसंघात श्री. राणेंसाठी काम केले. वेंगुर्ले तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित होत असून पुढील २ वर्षात राणे यांच्यामुळे वेंगुर्ले चा निश्चितपणे कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

\