राणेंच्या विजयाचा ठरला सिंधुदुर्ग जिल्हा “शिल्पकार”…

405
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रभाकर सावंत; मागच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या संघटनात्मक बांधणीचे यश…

ओरोस,ता.०४: नारायण राणे यांच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्हा विजयाचा शिल्पकार ठरला. महायुतीतील कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे चांगले मताधिक्य मिळाले, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे. आपण जिल्हाध्यक्ष असताना मिळालेला विजय हा कायम स्मरणात राहील. मागच्या ११ अध्यक्षांनी केलेल्या संघटनात्मक बांधणी मुळेच हा विजय मिळू शकला, असेही ते म्हणाले. याबाबत श्री. सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.

\