जेसीबीच्या धडकेत गंभीर झालेल्या मनिषची प्रकृती चिंताजनक…

1982
2
Google search engine
Google search engine
Google search engine

चालकावर गुन्हा दाखल; कारवाई करा मित्र परिवाराची पोलिसांकडे मागणी…

सावंतवाडी,ता.०५: जेसीबीची धडक बसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या खासकीलवाडा येथील मनीष देसाई या युवकाची तब्येत अधिकच खालावली आहे. त्याच्यावर गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्याचे काका मिलिंद देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जेसीबी चालक मोहन राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लवकरच त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी सांगितले. दरम्यान अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनीषच्या मित्र परिवाराकडून सावंतवाडी पोलिसांकडे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची त्यांनी भेट घेतली व लवकरात लवकर कारवाई करा, अशी मागणी केली.

\